न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२४) :- रस्त्याने दुचाकीवरून घरी जात असताना चार चाकीतून आलेल्या पाच ते सहा लोकांनी फिर्यादीच्या गाडीला डॅश देवुन त्यांची गाडी आडवली. फिर्यादी व त्यांच्या मित्राला शिवीगाळ केली. त्यांना लाथाबुक्याने तसेच गाडीच्या वायपरने बेदम मारहाण केली.
त्यांच्या गळ्यातील १.२ तोळ्याची सोन्याची चैन, सॅमसंग कंपनीचा एस २४ अल्ट्रा मोबाईल फोन व फिर्यादीच्या खिशातील १४ हजार रुपये असा एकुण २,३९,००० चा माल हिसकावुन घेतला. ”आम्ही रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहोत, पोलीस कम्प्लेंट केलीतर तुम्हाला जिवंत सोडनार नाही” अशी धमकी दिली. फिर्यादीच्या गाडीचे नुकसान करुन त्यांच्या गाडीची चावी घेत चारचाकीतुन आरोपी पळून गेले.
ही घटना (दि. ०७) रोजी रात्री ०१.३० च्या सुमारास डांगे चौक ते रावेत या रस्त्याने रावेतकडे जात असताना बालाजी कॉलेजच्या समोर, ताथवडे येथे घडली. फिर्यादी अतुल अरुण नलावडे (वय ३७ वर्षे, विकासनगर, रावेत) यांनी आरोपी १) केदार रणधीर नलावडे वय-२६ वर्ष रा. लेन नं. २, गणेशनगर, ओमकार कॉलनी थेरगाव, २) बापु बजरंग डांगे वय ३० वर्ष रा. दुर्गा सिलेक्शन समोर, मुक्ताई निवास, डांगे चौक थेरगाव, ३) यश जयकुमार माने वय-२२ वर्ष रा. हाकीम यांची खोली, लेन नं. २ मंगलनगर थेरगाव आणि २ ते ३ अनोळखी इसम यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी ८८१/२०२४ भारतीयन्याय संहिता कलम ३१० (१) (२), ३०९ (६), १२६(२), ३२४(४) (६), ३५१(२) (३), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपी क्र १ ते ३ यांना अटक केली आहे. मसपोनि घोरपडे पुढील तपास करीत आहेत.














