- ‘आप’च्या मागणीला यश; पालिकेकडून ठेकरदाराला दंडात्मक शिक्षा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० ऑगस्ट २०२४) :- थेरगाव रुग्णालयात पिण्याच्या पाण्याच्या फिल्टरमधून अशुद्ध पाणी येत असल्याचे निदर्शनास आले आहे. पाण्यात अळ्या आढळून आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
दरम्यान रुग्णलयात उपचारासाठी भरती असलेल्या पतीला महिलेनं हे पाणी पिण्यास दिले असता त्यात अळ्या आढळून आल्या. ‘आप’ पक्षाचे रविराज काळे यांनी घटनेचा उलगडा केला असता संबंधित फिल्टरमध्ये मोठ्या प्रमाणात आळ्या आढळून आल्या. त्यांनी संबंधित रुग्णालय प्रशासनाला याबाबत माहिती देत ठेकेदारावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर दिशा इंटरप्राईजेस या ठेकेदाराला महापालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली व आरोग्य विभागाकडून दहा हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे.
नियमानुसार आठ दिवसांमध्ये दोन वेळा फिल्टर्स हे साफ करणे बंधनकारक असते. ठेकेदाराकडून कामात हलगर्जीपणा केला जात आहे. त्यांच्यावर तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करून संबंधित ठेकेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी करीत रविराज काळे यांनी आळ्या असलेली पाण्याचे बॉटल सोमवारी आयुक्तांना भेट देणार असल्याचे सांगितले आहे.

















