न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑगस्ट २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगर पालिका दिव्यांग भवन फाऊंडेशन हे सर्व दिव्यांग व्यक्तींच्या थेरपी, दिव्यांगांचे पुनर्वसन करण्यासाठी व त्यांच्यामध्ये कौशल्य आणि सक्षमीकरण करण्यासाठी कार्यरत आहे.
दिव्यांग भवन फाऊंडेशनसाठी लोगो (बोधचिन्ह) व टॅगलाईन (घोषवाक्य मराठी व इंग्रजीमध्ये) निश्चित करण्यासाठी स्पर्धेचे आयोजन दि. १५/०८/२०२४ ते दि. ३१/०८/२०२४ दरम्यान करण्यात आले आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विजेत्या स्पर्धकास आकर्षक बक्षीसे यामध्ये लोगो (बोधचिन्ह) स्पर्धा विजेत्यास रु. ५०,००० घोषवाक्य (मराठी) स्पर्धा विजेत्यास रु. २५,००० व घोषवाक्य (इंग्रजी) स्पर्धा विजेत्यास रु. २५,००० देण्यात येणार आहेत.
दिव्यांग भवन फाऊंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक यांच्याकडून या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी व अधिक माहितीसाठी pcmcdivyangbhavan.org या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी.














