न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ ऑगस्ट २०२४) :- ‘अंदाजपत्रकात नागरी सहभाग’ या महापालिकेच्या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत शहरातील विविध भागांतून नागरिकांनी रस्ते, सांडपाणी, आरोग्य, उद्याने, क्रीडांगणे आणि इतर सुविधांबाबत पाचशेपेक्षा जास्त कामांचा समावेश करण्याच्या सूचना केल्या आहेत.
शहरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी महापालिकेकडून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये ‘पीसीएमसी स्मार्ट सारथी’ या मोबाइल अॅपच्या माध्यमातून नागरिक त्यांच्या अपेक्षा, सूचना, कल्पना ऑनलाइन पद्धतीने नोंदवत आहेत. त्यासाठी वृत्तपत्रे, रेडिओ, व्हीएमडी, सोशल मीडिया व चित्ररथाच्या सहाय्याने जनजागरण मोहीम सुरू आहे.
अनेकांनी आतापर्यंत या मोहिमेत सहभागी होऊन परिसरातील पायाभूत सुविधांबाबतच्या मागण्या, अभिप्राय नोंदविले आहेत. आतापर्यंत पाचशेपेक्षा नागरिकांनी कामांचा समावेश करण्याच्या सूचना केल्या आहेत.
शहरातील नागरिक महापालिकेचे अधिकृत संकेतस्थळ, स्मार्ट सारथी अॅप तसेच वेबलिंकद्वारे किंवा बारकोडद्वारे प्राथमिक माहिती भरून ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या अर्ज करू शकतात. ही कामे सुचविण्यासाठी नागरिकांना १० सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.– प्रवीण जैन, मुख्य लेखा व वित्त अधिकारी, महापालिका…












