न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ ऑगस्ट २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून येत्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज पिंपरी चौक येथील मध्यवर्ती कार्यालयात उपलब्ध आहेत.
उमेदवारी अर्ज ३१ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत उपलब्ध आहेत. तर, अर्ज ३ सप्टेंबरपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत स्वीकारण्यात येतील.
पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांनी उमेदवारी अर्ज घेऊन घ्यावेत. ते अर्ज मुदतीमध्ये आवश्यक कागदपत्रांसह पक्ष कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले आहे.

















