न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सिंधुदुर्ग (दि. ०५ सप्टेंबर २०२४) :- मालवण घटनेतील मुख्य आरोपी जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे. अंधाराचा फायदा घेत पोलिसांची नजर चुकवत आपल्या पत्नी आणि आईला भेटण्यासाठी तो कल्याणच्या राहत्या घरी आला होता. यावेळी पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कंत्राटदार जयदीप आपटेच्या शोधासाठी महाराष्ट्र पोलिसांनी सातहून अधिक पथके तैनात केली होती. ही पथके त्याचा शोध घेत होती. 26 ऑगस्ट रोजी शिवाजी पुतळा पडल्याच्या दिवसापासून पोलीस 24 वर्षीय जयदीप आपटेचा शोध घेत होते, मात्र आज तो त्याच्या घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
माहिती मिळताच कल्याण बाजारपेठ पोलिसांनी जयदीप आपटेच्या घरी धाव घेतली. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली आहे.