न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२४) :- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या अर्ज करण्याच्या प्रक्रियेत आता महत्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या अर्जाच्या प्रक्रियेसंदर्भातील घेतलेल्या निर्णयानुसार, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेंतर्गत राज्यातील सर्व महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर २०२४ मध्येही या योजनेंतर्गत नोंदणी सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली.
या योजनेसाठी आधी नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका, समूह संघटक-CRP (NULM, MSRLM व MAVIM)”, मदत कक्ष प्रमुख, CMM (City Mission Manager). आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना अर्ज स्विकारण्यास प्राधिकृत करण्यात आलं होतं.
मात्र, सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता अंगणवाडी सेविका व्यतिरिक्त इतर सर्व प्राधिकृत व्यक्तिना अर्ज स्विकृतीचे देण्यात आलेले अधिकार रद्द करण्यात आले आहेत. या निर्णयानुसार, आता फक्त अंगणवाडी केंद्रात अंगणवाडी सेविकामार्फत अर्ज स्विकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.
















