न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ०७ सप्टेंबर २०२४) :- केंद्र सरकारने वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना सरकारी सेवेतून बरखास्त करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाील गैरवर्तन व त्यानंतर कागदपत्रांमध्ये आढळलेली अनियमितता या पार्श्वभूमीवर पूजा खेडकर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पीटीआयने सुत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी यूपीएससीकडूनही पूजा खेडकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली होती. तसेच त्यांना यापुढे यूपीएससीकडून घेण्यात येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये बसता येणार नाही, असंही यूपीएससीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं.
















