न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ सप्टेंबर २०२४) :- राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधी असण्याचा बहाणा केला. राहत्या परिसरातील अन्य लोकांमध्ये तशी बतावणी केली. अधिकारपदावर आहे असा लोकांमध्ये समज व्हावा म्हणून जाणीवपूर्वक त्या अधिकारपदाचे बनावट व्हिजीटींग कार्ड बनवले. त्यावर शासनाच्या परवानगीशिवाय अशोक स्तंभ या राज्य प्रतीकाचा वापर केला. त्या व्हिजीटींग कार्डचा वापर तोतयागिरी करून लोकांची फसवणुक करण्यासाठी केला असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि.०४/०५/२०२४ ते आज पावेतो) पिंपळे सौदागर परिसरात घडली. ओंकार श्यामराव जोशी (अंदाजे वय ४५ वर्षे, रा. काटे वस्ती, पिंपळे सौदागर) याच्या विरोधात सांगवी पोलीस ठाण्यात ३६१/२०२४ बी.एन.एस. कलम २०४, २०५, ३३६ (२), ३३६(३), ३४०(२), ३१९ (२) सह भारताचे राज्य प्रतीक (अयोग्य वापरास प्रतिबंध) कायदा २००५ चेकलम ७ (१) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोउपनि कणसे पुढील तपास करीत आहेत.
















