न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- कोथरूड येथील करिश्मा सोसायटीच्या बाजूने टेम्पो चालक भरधाव वेगाने सावरकर पुलाच्या दिशेने निघाला होता. त्या दरम्यान त्याने ६ चार चाकी आणि २ दुचाकी वाहनांना जोरात धडक दिली.
भरधाव निघालेल्या टेम्पो चालकास वाहनांमधून उतरून नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले असून या घटनेतील टेम्पो चालकाने मद्यपान केल्याचे दिसून आले आहे. तसेच या घटनेत दुचाकीवरील दोघे जण गंभीर झाले. त्या दोघांना जवळील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
कल्याणीनगर भागात काही महिन्यांपूर्वी अल्पवयीन मुलाच्या पोर्शे गाडीने दोघांना चिरडल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.
















