न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- सांगवी बोपोडी दरम्यान मुळा नदीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे बांधण्यात येत असलेल्या उडाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात असून, त्यासाठी ३२ कोटी ३६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. आता या पुलाच्या सुशोभीकरणावर अतिरिक्त २० कोटी ६५ लाखांचा खर्च केला जाणार आहे. उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितल्यामुळेच हे सुशोभीकरण करण्यात येत असल्याचे उत्तर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.
या पुलाच्या उभारणीसाठी आतापर्यंत एकूण ३२ कोटी ३६ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. हे काम टी ॲण्डटी इन्फ्रा लिमिटेड कंपनी करत आहे. कामाची मुदत २ वर्षे होती. मात्र, पुण्याकडील राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राची जागा मिळण्यास विलंब झाल्याने ठेकेदाराला ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप पुलाचे काम पूर्ण झाले नसून, त्यावरून वाहतूक, रहदारी सुरू करण्यात आलेली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
अशा परिस्थितीत, पुलाच्या सुशोभीकरणासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार, आता केवळ सुशोभीकरणावर २० कोटी ६५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या नव्या खर्चास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी ५ ऑगस्ट २०२४ ला स्थायी समितीची मान्यता दिली आहे. हे कामदेखील टीॲण्डटी इन्फ्राला देण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणारा हा पूल आहे. त्यामुळे पुलाचे सुशोभिकरण करण्यासाठी माजी महापौर आणि माजी नगरसेवकांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार, पुलाचे संकल्पचित्र तसेच प्राथमिक आराखडा बनविण्यात आला. त्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर २५ ऑगस्टला सादरीकरण करण्यात आले. त्यांनी आराखड्यात बदल सुचविले. त्यानुसार, तयार करण्यात आलेल्या अंतिम आराखड्यानुसार पुलाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे, असे महापालिकेच्या स्थापत्य प्रकल्प विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, पुलाची व सुशोभिकरणाची एकत्रित निविदा काढली का नाही, असे विचारले असता, सुशोभीकरणाचा प्रस्ताव नंतर आल्याचे अधिकाऱ्यांनी सां
















