न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :-ओरिएंटल मार्व्हल सोसायटी तर्फे गणेशोत्सव निमित्त रविवार दिनांक ८ सप्टेंबर २०२४ रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमास महिला व पुरुषांनी भरगोस प्रतिसाद देऊन १०८ बॅगचे रक्त संकलन झाले.
गणेशोत्सवा निमित्त आज पर्यंत च्या झालेल्या रक्तदानाच्या जास्तीच्या बाटल्यांचे रक्तदानाचे उद्दिष्ट साध्य झाले. YCM रक्तपेढी डॉ. मुसर्गी यांच्या साहाय्याने हे रक्तदान शिबिर ठेवण्यात आले होते. यंदाचे रक्तदान शिबिराचे हे सलग ९ वे वर्षे आहे. या शिबिरात अठरा वर्ष पूर्ण झालेले युवक व युवतींनी देखील विशेषता रक्तदान केले
यामध्ये सोसायटीचे अध्यक्ष विशाल कुलकर्णी, सचिव साकेत भलगट, खजिनदार चंद्रशेखर शिरसागर , संतोष पाटील, सुनिल कांदळकर, अभिजीत बाबर, वरून कुलकर्णी, श्याम कापरे, सुभाष जोशी, अभिजीत मांगले, हेमंत देशमुख, मनोज सग्रि, शाम कापरे, राजन पाटील, मारुती पाटील, योगेश लंके, अमित भिसे, अशोकानंद घाडगे, प्रशांत पाटील, प्रमोद चौगुले व सोसायटी मधील सदस्य तसेच ओम निसर्ग मंडळ यांचे सहकार्य लाभले.














