न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- “स्वरपंचम म्युझिक अकॅडमी” च्या काळेवाडी व पिंपळे सौदागर शाखेच्या वतीने गुरुवर्य पं. सुधाकर चव्हाण आणि गुरुवर्य पं. रघुनाथ खंडाळकर यांचा गुरुपूजन सोहळा निगडी प्राधिकरणात आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व दीप प्रजनन करून झाले. पतियाळा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित किरण परळीकर, ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे, स्वरपंचम म्युझिक अकॅडमीचे संस्थापक संचालक चंद्रकांत वाघचौरे, संचालक अभयसिंह वाघाचौरे, तसेच तानाजी पाटील, बाळासाहेब वाडेकर, आण्णा गुरव, तबलावादक कार्तिक स्वामी व इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अप्रतिम गायन वादन सादरीकरण झाले.
विद्यार्थ्यांच्या गायन वादनानंतर पं . सुधाकर चव्हाण यांचे शिष्य अभयसिंह वाघाचौरे यांचे शास्त्रीय गायन झाले. त्यांनी “शुद्ध सारंग ” राग अतिशय तयारीने सादर केला. त्यानंतर ठुमरी व “ओम नमो भगवते वासुदेवाय ” ही रचना अतिशय भावपूर्ण सादर करून आपले समारोप गायन संपविले. कार्तिक स्वामी (तबला ), हरिभाऊ आसतकर (संवादिनी), चौरंगनाथ खांडेकर (पखवाज), नरेंद्र काळे (तालवाद्य) यांनी त्यांना उत्कृष्ट साथसंगत केली.
विद्यार्थी, पालक गुरुजन व रसिक यांनी गायनाला उत्कटपणे दाद दिली. त्यानंतर गुरुवर्य पंडित सुधाकर चव्हाण यांचे गुरु पुजन करण्यात आले. पंडित किरण परळीकर, पंडित प्रभाकर पांडव, ह भ प लक्ष्मणबुवा पवार यांचा सन्मान करण्यात आला. त्या प्रसंगी गुरुजी पं. सुधाकर चव्हाण व पं. किरण परळीकर यांनी स मार्गदर्शन केले. गुरुपूजन सोहळा थाटामाटात संपन्न झाला.














