न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ सप्टेंबर २०२४) :- रहाटणी-काळेवाडी परिसरातील नागरिकांसाठी श्री. मच्छिंद्र तात्या तापकीर सोशल फाऊंडेशनच्या वतीने ‘घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे.
विजेत्यांना एलईडी टीव्ही, पैठणी, मोबाईल, गॅस शेगडी, मिक्सर, सोन्याची नथ, इलेक्ट्रीक शेगडी, डिनर सेट, वॉटर फिल्टर, इस्त्री यासारखी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. याशिवाय सहभागी भक्तांसाठी शंभर उत्तेजनार्थ बक्षीसांचे वाटपही यावेळी करण्यात येणार आहे.
स्पर्धकांनी आपल्या गौरी गणपतीच्या घरगुती सजावटीचा स्वतंत्र फोटो, व्हिडीओ व सजावटीसोबत सेल्फी ९१५५८०८०८० या नंबरवर पाठवावा. स्पर्धकांनी पूर्ण नाव व पत्ता व सपंर्क क्रमांकावर पाठवावा. अंतिम निर्णय आयोजकांचा असेल. सजावट ही पर्यावरण पुरक (Eco Friendly) असेल. स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारीख १२ सप्टेंबर असेल. अंतिम निकालाचा दिनांक अगोदर कळवला जाईल.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी गणेश भक्तांनी श्री. सागर मच्छिंद्र तापकीर यांचे जनसंपर्क कार्यालय तापकीर नगर, काळेवाडी येथे अथवा हेल्पलाईन नं: +91 9155808080 यावर संपर्क साधावा. तसेच मोठ्या संख्येने स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजक राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शरदचंद्र पक्षाचे कार्याध्यक्ष सागर मच्छिंद्र तापकीर यांनी केले आहे.














