न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव (दि. १२ सप्टेंबर २०२४) :- गणेश विसर्जनाला सुरूवात झाली असल्याने वेगवेगळ्या मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. दरम्यान तळेगाव दाभाडे येथे शुक्रवार (दि. १३) रोजी सायंकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
बंद आणि पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे…
- बंद मार्ग : तळेगाव ते एचपी चौक जाणाऱ्या-येणाऱ्या जड अवजड वाहतुकीस प्रवेश बंद.
- पर्यायी मार्ग :- वडगाव फाटा – वडगाव कमान तळेगाव एमआयडीसी- नवलाख उंबरे – वासुली फाटा येथून तसेच एचपी चौकाकडून जांबवडे फाटा, जाधववाडी गाव- नवलाख उंबरे आंबी एमआयडीसी मार्गे.
- बंद मार्ग :- वडगाव फाटा ते इंद्रायणी कॉलेज हलक्या व दुचाकी वाहनांना प्रवेश बंदी.
- पर्यायी मार्ग :- वडगाव फाटा, निलया सोसायटी कॉर्नर, मंत्रा सिटी रोड मार्गे, हिंदमाता भुयारी मार्ग, जनसेवा वाचनालय इंद्रायणी कॉलेज मार्गे जाता येईल.
- बंद मार्ग – चाकण बाजूकडून तळेगावकडे जाण्यास अवजड वाहतुकीस बंद
- पर्यायी मार्ग :- देहूफाटा अमृतवेल हॉटेल कॉर्नर, इंदोरी बायपास मार्गे, नवलाख उंबरे, तळेगाव एमआयडीसी मार्गे.
- बंद मार्ग:- मारुती मंदिर चौक ते प्रतीक गारमेंट्स कडे जाणारी वाहतूक बंद. मारुती मंदिर चौकातून जिजामाता चौकाकडे जाणारा येणारा रस्ता बंद, जिजामाता चौक ते गणपती चौक व डोळसनाथ मंदिराकडे जाणारा मार्ग बंद. खांडगे पेट्रोल पंप ते जिजामाता चौक हा दोन्ही बाजूचा मार्ग बंद.
- पर्यायी मार्ग – गावठाणातील अंतर्गत रस्त्यांचा वापर करून इच्छित स्थळी जाता येईल.
- बंद मार्ग :- हॉटेल आपुलकी ते इंदोरी गावठाण रस्ता बंद.
- पर्यायी मार्ग – इंदोरी बायपास मार्ग व गावठाणातील अंतर्गत रस्त्याने जाता येईल.
















