न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२४) :-पिंपरी चिंचवड महापालिकेचे सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे मुख्य अभियंता -१ या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य अभियंता श्रीकांत सवणे हे ३१ ऑगस्ट, २०२४ रोजी सेवेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असल्याने रिक्त मुख्य अभियंता -१ हे पद रिक्त झाले होते. या पदाचा अतिरक्त पदभार सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
त्यांच्याकडे यापूर्वी असलेल्या स्थापत्य विभागाचे कामकाज कायम राहणार असून आता पाणीपुरवठा विभागाचे कामकाज देखील असणार आहे. यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने आदेश निर्गमित केला आहे.
















