न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने कार्यालयीन सोयीनुसार अंतर्गत नियुक्ती, बदल्या केल्या आहेत. त्यानुसार सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्याकडे उद्यान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे यांच्याकडे आणि ‘फ’ क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे.
तर नवीन नियुक्त महेश वाघमोडे यांच्याकडे ह प्रभाग कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी यापूर्वी भुसावळ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी या पदावर कामकाज केले आहे.
प्रशासकीय कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे यांच्याकडे उद्यान विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांच्याकडे यापूर्वी ह क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच क क्षेत्रीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी दशरथ कांबळे यांच्याकडे क क्षेत्रीय कार्यालयाबरोबरच फ क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रशासन अधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.
















