न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० सप्टेंबर २०२४) :- चिखलीतील आयआयबीएम कॉलेजच्या “प्रशासकीय प्रमुख” कु. प्रतिक्षा सुभाष डफळ यांना ‘नवराष्ट्र रत्न २०२४’ या पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. लेडी सिंघम, कराटे ब्लॅक बेल्ट होल्डर, नॅशनल चॅम्पियन, सेल्फ डिफेन्स ट्रेनर अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत, कॉलेजचा शिक्षक वर्ग आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कु. प्रतिक्षा सुभाष डफळ यांनी आजवर शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थीनी आणि महिलांसाठी अनेक उपक्रम राबविले. मुलींना मोफत डिफेन्स ट्रेनिंग व गुड टच बॅड टच याच मार्गदर्शन केलं. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील शाळांमध्ये मुलींना संरक्षणाचे धडे दिले. चिखली पोलीस स्टेशनच्या मार्गदर्शनाने पिंपरी चिंचवड मध्ये विद्यार्थिनी आणि महिलांसाठी डिफेन्स ट्रेनिंग सुरु केलं. दहावी व बारावीनंतरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बुद्धिमत्तेनुसार शिक्षण क्षेत्राविषयी सखोल मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्याना करिअरच्या वाटा दाखवून परदेशापर्यंत पोहचविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.











