- वाकडच्या पंजाब नॅशनल बँकेतील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२४) :- लहान मुलांना चप्पल बुट घालुन सोफ्यावर खेळु नका, असं बोलल्याचा राग आल्याने बँक मॅनेजरला दोघांनी हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. मारहाणीचा हा प्रकार शनिवारी (दि. २१) रोजी दुपारी ०२.४५ वा ते ०३.०० वा. सुमारास पंजाब नॅशनल बँक, वाकड येथे घडला आहे.
दरम्यान तेवढ्यावरच न थांबता इतरांना फोन करुन बँकेत बोलावुन घेऊन गैरकायदयाची मंडळी जमवली. संगणमताने कामात अडथळा करुन काम करुन देणार नाही अशी धमकी देऊन बॅकेमधील कर्मचाऱ्यांना देखील शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी मोहम्मद रझा काद्री (बँक मॅनेजर) यांनी १) कौसुर नुर मोहम्मद शेख, २) अल्फिया आरिफ शेख रा. अंकुर हॉस्पीटल जवळ, पोलीस लाईन कार्नर, वाकड, पुणे., ३) रिझवान नुर सय्यद, ४) आवेश मतिन खान, ५) साहील जोगदंड ६) आयशा आरिफ शेख यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी १०३२/२०२४ बी.एन.एस. कलम १३२.१८९ (१) (२).१९०,११५(२),३५२, ३५१(२) (३) प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत माने, पोलीस उप-निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.
















