न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २२ सप्टेंबर २०२४) :- चाकण येथील दुयम निबंधक कार्यालयात सहा जनांनी मिळून संगनमताने फिर्यादीची पाडळी येथील वडीलोपार्जीत सामाईक क्षेत्रापैकी आरोपी १ यांच्या हिस्याचे ४१ आर क्षेत्राचे विक्रीसाठी साठेखत तयार केले.
दस्तासाठी कायदेशिर मान्यता देणार म्हणून फिर्यादीची सही अंगठे आवश्यक असतांना फिर्यादी ऐवजी दुसराच कोणीतरी व्यक्ती उभा करुन त्यावर फिर्यादीचे खोटे व बनावट सहया अंगठे केले. दस्ताचा वापर करून खरेदी खत करुन त्याव्दारे फेरफार करीत असतांना आढळून आले, असं फिर्यादीत नमूद आहे. ही घटना (दि १७/१२/२०२१) चाकण येथील दुयम निबंधक कार्यालयात घडली.
याप्रकरणी आंनदा दामु भोसले (वय ६० वर्षे, धंदा शेती, रा. पाडळी, वाडा रोड, ता. खेड जि. पुणे) यांनी आरोपी १) गोविंदा ऊर्फ रामु दामु भोसले, रा. पाडळी ता. खेड जि. पुणे, (खरेदी देणार), २) धिरज कुमार सुरेद्र शेठीया रा. चाकण ता. खेड जि. पुणे, (खरेदी घेणार), ३) सुनिल गणपत वाळुंज रा. शिरोली ता. खेड जि. पुणे (साक्षीदार), ४) दिपक कोडीभाऊ पाबळे रा. कडघे ता. खेड जि. पुणे (साक्षीदार) व ५) साठेखताला माझे जागी उभा राहिलेला तोतया व्यक्ती तसेच (पत्ता माहित नाही), ६) रविंद्र कर्नावट वकील रा.खेड यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे.
चाकण पोलिसांनी ६६४/२०२४ भा.द.वि. कलम ४१९, ४२०,४६५, ४६७,४६८, ४७१,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि तलवाडे पुढील तपास करीत आहेत.
















