न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ सप्टेंबर २०२४) :- पिंपरी, चिंचवड व भोसरी विधानसभेवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाने दावा ठोकला आहे. पक्षाच्या पिंपरीतील मध्यवर्ती कार्यालयात रविवारी (दि.२२) रोजी मासिक बैठकीमध्ये बहुमताने ठराव पारित करून अजितदादांकडे मागणी करण्यात आली आहे.
पिंपरी विधानसभा हा राष्ट्रवादीच्या कोट्यातील अधिकृत उमेदवार संघ आहे. तो पक्षाच्या वतीने महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच लढणार आहे. त्या व्यतिरिक्त भोसरी व चिंचवड विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादी पक्षाची फार मोठी ताकद आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघ चिंचवड व भोसरी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा, असा ठराव पक्षाच्या मासिक सभेमध्ये शहर कार्याध्यक्ष फजल शेख यांनी मांडला. त्या ठरावाला महिला अध्यक्षा कविता आल्हाट यांनी अनुमोदन दिले आहे.
यावेळी आमदार आण्णा बनसोडे, जेष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मा. महापौर मंगला कदम, शहर कार्याध्यक्ष फजल शेख, महिला अध्यक्षा आल्हाट यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
















