न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ सप्टेंबर २०२४) :- पवना नदीमध्ये मळेकर घाट येथे शुक्रवारी (दि. २७) एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. रावेत पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला.
याबाबत माहिती अशी की, मळेकर घाट रावेत येथे पवना नदीमध्ये शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास एक व्यक्ती पाण्यावर तरंगत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. प्राधिकरण उप अग्निशमन केंद्र व मुख्य अग्निशमन केंद्र, पिंपरी येथील जवानांनी पाण्यावर तरंगत असलेल्या व्यक्तीचा मृतदेह बोट व रोपच्या साहाय्याने बाहेर काढला.
प्रमुख अग्निशमन विमोचक संपत गाँड, विकास नाईक, संजय महाडिक, यंत्रचालक रुपेश जाधव, फायरमन अनिल माने, वाहन चालक राजेश साखळे, संभाजी सूर्यवंशी, ट्रेनी फायरमन गौरव सुरवसे, तेजस पवार, राकेश महामुलकर, शिवाजी पवार, संकेत भोसले, प्रतीक डोके हे या वर्दीवर हजर होते.












