न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ सप्टेंबर २०२४) :- व्हॉट्सअपवर लिंक पाठवून पर्सनल माहीती भरण्यास सांगितली. ग्रुपमध्ये अॅड केले. ग्रुपमधील सदस्यांना एक स्टॉक सांगुन त्यावर निरीक्षण किंवा खरेदी करण्याचा सल्ला दोघांनी दिला. ग्रुप हा सेबी रजिस्टर्ड असल्याचे खोटे सांगतिले. लिंक शेअर करून अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. दोघांनी दिलेल्या वेगवेगळया बँक खात्यामध्ये एकुण ९१,६३,००० रू. (एक्यान्नव लाख त्रेसष्ठ हजार रूपये) भरण्यास भाग पाडले. गुंतवणूकीवर ७,१९,४७,११४.५६ रूपये जमा झाल्याचे भासवले. संगणकीय साधनांचा वापर करून आर्थिक फसवणूक केली, असं फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि १०/०४/२०२४ ते दि. १८/०७/२०२४) दरम्यान फिर्यादीच्या राहते घरी, रहाटणी येथे घडली. याप्रकरणी वामन लक्ष्मण एखंडे (वय ४१ वर्ष, सॉफ्टवेअर अभियंता, रा. काळेवाडी-रहाटणी) यांनी आरोपी १) महिला अंजली शर्मा, २) नरेश राठी यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड पोलिसांनी १०५८/२०२४ बी.एन.एस. कलम ३१८ (४),३१९ (२), ३ (५) सह माहिती तत्रज्ञान अधिनियम २००० चेकलम ६६ डी, प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि साळुंखे पुढील तपास करीत आहेत.












