न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (दि. २९ सप्टेंबर २०२४) :- प्लॉटमधील दगड पाडण्याकरीता लावलेल्या ब्लास्टिंगमुळे दगड उडाले. शेजारील कंपनीत काम करणा-या कामगारांना ते लागले. त्यातील अजित कुमास भूचकुन साह (वय २५ वर्ष) या कामगाराचा मूत्यु झाला. तसेच राम प्रवेश राम प्रसाद व राहुल राम प्रसाद यांना गंभीर व किरकोळ दुखापतीस आरोपी कारणीभूत ठरले आहेत.
ही घटना मावळ तालुक्यातील मंगरुळ येथील कॉमोस कंपनीमध्ये (दि.२८) सकाळी ११.३० च्या सुमारास अचानकपणे कोणतीही पुर्व सुचना न देता घडली. याप्रकरणी मुनुस्वामी वर्धराजनारायण स्वामी यांनी आरोपी ब्लास्टिंग करणारे अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी २१४/२०२४ भारतीय न्याय संहीता २०२३ कलम १०६ (१), २८८,१२५ (अ) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि गोवारकर पुढील तपास करीत आहेत.












