न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२४) :- दोघा जणांनी गोड बोलत फिर्यादीच्या मुलाला गाडीवरून नेले. त्यांच्या इतर साथीदारांच्या मदतीने जुन्या भांडणाच्या कारणावरुन धारदार हत्याराने फिर्यादीच्या मुलाच्या डोक्यात ठिकठिकाणी मानेवर व दोन्ही हातावर वार करुन त्याचा खून केला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हेतुने पुनावळे-मारुंजी हददीलगत असलेल्या खदानीच्या पाण्यात त्याचा मृतदेह फेकुन दिला, असं फिर्यादीत नमूद आहे.
विकी ऊर्फ शुभम सिताराम परिहार (वय २१ वर्ष, रा. जांबे) असं खून झालेल्या मुलाचं नाव आहे. हा प्रकार (दि.२६) रोजी सायं ५.०० वा ते (दि.२८) रोजी दुपारी ४.०० वा दरम्यान शितळादेवीनगर, शिवाजी चौक, जांबे ता. मुळशी ते पुनावळे मारुंजीतील खदानीत घडला.
याप्रकरणी लालन सिताराम परिहार (वय ५० वर्षे, रा. जांबे) यांनी आरोपी १) दिपक आशोक जाधव (वय-२३ वर्षे रा. शितळादेवी मंदिराजवळ, जांभे पुणे. मुळ रा. रुई गव्हाण ता.जि.बीड), २) अरविंद रसिवाल कुंभार (वय-२२ वर्षे रा. सुधीर कोयतेच्या विट भटटीजवळ, काटे वस्ती पुनावळे, पुणे), व त्याचे साथीदार निष्पन्न आरोपी ३) ऋषीकेश नृहसिंह वाघमारे, वय-१८ वर्षे, रा-रानवावस्ती, कोयतेवस्ती जांबे, पुनावळे, पुणे. ४) विशाल लक्ष्मण डाडर वय-२१ वर्षे, रा-दत्तात्रय भुजबळ यांची रुम रसीकवाडी, जांबे पुणे, ५) मारुती जनक सातपुते वय १८ वर्षे, रा-सुरेश कोयते यांची रुम कोयतेवस्ती पुनावळे पुणे यांच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ११०७/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०३,२३८, ३(५) नुसार गन्हा दाखल करीत त्यांना अटक केली आहे. सपोनि जाधव पुढील तपास करीत आहेत.













