न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० सप्टेंबर २०२४) :- विधान परिषद आमदार म्हणून शपथ घेतल्यानंतर आमदार अमित गोरखे यांनी जवळजवळ २५ पेक्षा जास्त जिल्हे आणि १५० पेक्षा जास्त तालुक्यांमध्ये महाराष्ट्रभर बहुजन समाजामध्ये संवाद यात्रेद्वारे संपर्क साधला असून ठिकठिकाणी या यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
पहिल्यांदाच खानदेशामध्ये जामनेर या मतदारसंघांमध्ये अमित गोरखे यांची सभा झाली. त्या सभेला मातंग समाज आणि इतर समाजाचा भरघोस प्रतिसाद मिळाला. जामनेर मधील मुख्य रस्ता बंद होऊन संपूर्ण समाज अमित गोरखे यांच्या स्वागतासाठी बाहेर पडलेला पहिल्यांदा जामनेरकरांनी पाहिला. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन त्याचबरोबर लहुजी शक्ती सेनेचे विष्णू कसबे व इतर पदाधिकारी या सभेला उपस्थित होते.
याप्रसंगी गिरीश महाजन यांनी खास करून अनुसूचित जाती जमातीतील विधानसभा व महाराष्ट्रातील सर्व जनतेला आजपर्यंत महायुतीनेच मदत केली आहे. त्याचबरोबर जामनेरमध्ये लवकरच साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याची घोषणाही केली.
आमदार अमित गोरखे यांनी महायुती सरकारने कशा पद्धतीने अनुसूचित जाती जमातीतील सर्व जनतेला मदत केली आहे, याविषयी सांगितले. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना निवडणुकीत पाडण्याचे काम काँग्रेसने केले होते. राहुल गांधी त्याचबरोबर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष व पदाधिकारी हे आरक्षण विरोधी वारंवार बोलत आहेत. याची आठवण त्यांनी करून दिली. महायुती सरकारच्या काळात अनुसूचित जाती जमातीसाठी आलेल्या भव्य योजना व त्याची माहिती त्यांनी याप्रसंगी सांगितली.













