न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ ऑक्टोबर २०२४) :- जिल्हास्तरीय शालेय १४ वर्षीय मुलांच्या थ्रो बॉल स्पर्धेत चिंचवड येथील सेंट अँड्र्यूज हायस्कुलने पहिला क्रमांक पटकावला असुन सिटी प्राइड स्कूल द्वितीय ठरले.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने १४ वर्षीय मुलांच्या जिल्हास्तरीय शालेय थ्रोबॉल स्पर्धेचे आयोजन चिंचवड येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुलात करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन क्रीडाधिकारी अनिता केदारी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी थ्रो बॉल असोसिएशनचे सेक्रेटरी राजेंद्र मागाडे, स्पर्धा प्रमुख रंगराव कारंडे, संजय डोके, क्रीडाशिक्षक लक्ष्मण माने, हनुमंत सुतार आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत चिंचवड येथील सेंट अँड्र्युज हायस्कुलने प्रथम क्रमांक पटकावला असुन सिटी प्राइड स्कूल ने द्वितीय क्रमांक मिळवळे आहे. या स्पर्धेसाठी जय खपले आणि नम्रा आत्तार यांनी पंच म्हणून काम पाहिले.