न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२४) :- अपघात प्रकरण आपापसात मिटवून देण्यासाठी तसेच कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली. लाच स्वीकारताना पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. पुनावळे येथे शुक्रवारी (दि. ११) ही कारवाई करण्यात आली.
ज्ञानदेव तुकाराम बगाहे (नेमणूक सवेत पोलिस ठाणे) असे रंगेहाथ पकडलेल्या पोलिस हवालदाराचे नाव आहे. लाच मागितल्याप्रकरणी ५७ वर्षीय व्यापाऱ्याने
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार व्यापारी यांचा मुलगा आणि एका दुचाकीस्वाराचा अपघात झाला होता. याप्रकरणी एमएलसी होऊन पोलिस हवालदार बगाडे यांनी जबाब नोंदणी केली होती.
हे अपघात प्रकरण आपापसात मिटवून देण्यासाठी तसेच तक्रारदार व्यापारी यांच्या मुलावर कायदेशीर कारवाई न करण्यासाठी पोलिस हवालदार बगाडे यांनी तक्रारदार व्यापारी यांच्याकडे पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. व्यापा-याने तक्रार केल्यानंतर लाचलुगपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तसेच पाच हजारांची लाथ स्वीकारताना बगाडे याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रावेत पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















