- डॉक्टरांकडून त्यांना विश्रांतीचा सल्ला…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. १४ ऑक्टोबर २०२४) :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी झाल्याची माहिती मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर एचएन रिलायन्स रुग्णालयात अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली आहे. उद्धव ठाकरे स्वत:चं मेडीकल रुटीन चेकअप करण्यासाठी मुंबईतील एचएन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये सकाळी आठ वाजता दाखल झाले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांची रुटीन चेकअप केली त्यावेळेस त्यांच्या रक्त वाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना अॅन्जिओप्लास्टीचा सल्ला दिला. त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्यावर अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर 2012 मध्ये सुद्धा अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली होती. त्यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आढळून आले होते. पण आता थोड्या वेळापूर्वी त्यांच्यावर सुखरुप अॅन्जिओप्लास्टी झालेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज सकाळी आठ वाजता एच एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी दाखल झाले होते. हृदयामधील हार्ट ब्लॉकेजची तपासणी झाल्यानंतर त्यांच्यावर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी बारा वाजताच्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली. उद्धव ठाकरे यांना मागील दोन-तीन दिवसांपासून त्रास जाणवू लागल्याने आज सकाळी मुंबइतील रिलायन्स हरिकिसन दास रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी आदित्य ठाकरे यांनी माहिती दिली आहे. त्यांनी सोशल पोस्ट करत म्हटले की, आज सकाळी, उद्धव ठाकरेजी यांनी सर एचएन रिलायन्स रुग्णालयात पूर्व नियोजित तपासणी केली. तुमच्या शुभेच्छांसह, सर्व काही ठीक आहे, आणि ते कामावर येण्यासाठी तसेच लोकांची सेवा करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत.