न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ ऑक्टोबर २०२४) :- थेरगाव येथील जगतापनगरमध्ये (दि. १२ ते दि. १३) रोजी फिर्यादी यांचा मुलगा साहिल राहुल साबळे (वय १८ वर्षे, रा. बौध्द नगर, झोपडपट्टी, पिंपरी) याने गणेश ऊर्फ दादु रोकडे याचा खुन केला होता. त्याचा राग मनात धरुन व त्याचा बदला घेण्याच्या उद्देशाने कट रचला.
संगणमत करुन फिर्यादीचा मुलगा साहिल याच्या तोंडावर धारदार हत्याराने वार करुन व दगडाने ठेचुन त्याचा खुन केला आहे, असं फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी ३५ वर्षीय महिलेने आरोपी १) अरुण परदेशी वय अंदाजे १९ वर्ष रा. काळेवाडी, २) यश भगवान रोकडे वय अंदाजे २० वर्ष रा. बौध्दनगर, पिंपरी, ३) अशपाक दिलशाद शेख, ४) प्रथमेश विष्णु हजारे वय वय अंदाजे २१ वर्ष रा. बौध्दनगर, ५) ओमकार कामत (वय अंदाजे २४ वर्ष (गळयावर टॅट्यु असलेला) पत्ता माहिती नाही, ६) लक्ष्मण कोळी (वय अंदाजे २० वर्ष रा. बौध्दनगर), ७) साहिल (वय अंदाजे २१ वर्ष पुर्ण नाव पत्ता माहिती नाही (हातावर टॅट्यु असलेला) व त्यांचे इतर साथीदार यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
वाकड (काळेवाडी) पोलिसांनी १०९५/२०२४ भारतीय न्याय संहिता कायदा कलम १०३ (१), ६१(२),२३८, १८९(२), १८९(४),१९१(२),१९१ (३), १९० सह भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ४ (२५) ४(२७), ३५ म. पो.का.क.३७ (१) (३)/१३५ प्रमाणे सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सपोनि निलेश नलवडे वाकड पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहेत.
















