- निवडणूक कार्यक्रम आणि आचारसंहिता आजपासुन लागण्याची शक्यता?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि.15 ऑक्टोबर 2024) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची बहुप्रतीक्षित घोषणा आजच होणार आहे. राजकीय वर्तुळासह अख्ख्या महाराष्ट्राचं, किंबहुना देशाचं लक्ष लागून राहिलेल्या निवडणुका आज दुपारी साडेतीन वाजता जाहीर होणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीतून पत्रकार परिषद घेत दुपारी साडेतीन वाजता महाराष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणुकांचीही घोषणा करेल. विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच महाराष्ट्रात आदर्श आचारसंहिता लागू होईल.
२७ नोव्हेंबरपूर्वी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कधी आणि किती टप्प्यात मतदान होणार, मतमोजणी होऊन निकाल कधी जाहीर होणार, याकडे सर्वसामान्य नागरिकांचेही डोळे लागले आहेत. या प्रश्नांची उत्तरं दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेत मिळणार आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत.