न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२४) :- ”आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेल्या २७ वर्षापासून सामाजिक क्षेत्रात तसेच पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणारे वृक्षप्रेमी डॉ. विजयकुमार पाटील यांच्या कार्याची नोंद नुकतीच “लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्” मध्ये झाली. ही बाब आपल्या पिंपरी चिंचवड शहरासाठी, महाराष्ट्र राज्यासाठी तसेच देशासाठीही भूषणावह नक्कीच आहे. त्यांच्या ह्या कार्यामुळे पर्यावरपूरक चळवळीला बळकटी मिळेल, असे गौरवोद्गगार आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी माजी नगरसेविका माई काटे, माजी नगरसेवक निलेश पांढरकर, संतोष कुदळे, राष्ट्रवादी युवा अध्यक्ष सुधिर काटे, विजय पांढरकर, प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष विशाल शेवाळे, संतोष चव्हाण आदी उपस्थित होते.
माजी नगरसेवक निलेश पांढरकर म्हणाले, “माझे सामाजिक कार्यातील सहकारी मित्र गेल्या अनेक वर्षांपासून शहरामध्ये पर्यावरणपूरक उपक्रम राबवित आहेत. त्यांच्यासोबत आम्ही सुद्धा ह्या समाजउपयोगी कार्यात सहभागी होत असतो. त्यांचे वृक्षसंवर्धनाबाबतचे कार्य मोठे आहे. आज जागतिक पातळीपर्यंत ते आता पोहचले आहेत. त्यांचे झालेले “वर्ल्ड रेकॉर्ड” हे आमच्या मित्र परिवारासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. त्यांच्या ह्या वृक्षसंवर्धन चळवळीच्या कार्याला शुभेच्छा.
याप्रसंगी माजी नगरसेविका माई काटे, तसेच माजी नगरसेवक संतोष कुदळे यांनी सुद्धा डॉ. पाटील यांचे अभिनंदन केले.
















