न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२४) :- नवी सांगवी येथील माहेश्वरी चौकातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मशानभूमी समोर असलेल्या जलसंपादन विभागाच्या जागेतील अनधिकृत ३१ झोपड्या, जलसंपदा विभागाच्या सोसायटीच्या आवारात असलेले अनधिकृत तीन शेड, तीन टपऱ्या हटविण्यात आल्या.
तसेच, येथील एक हातगाडीदेखील जप्त करण्यात आली. महापालिकेच्या ह आणि ड क्षेत्रीय कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी अतिक्रमण विभागाकडून कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये अतिक्रमण विभागाचे उपायुक्त मनोज लोणकर, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता नितीन जयस्वाल, उपअभियंता म. द. पाटील, शाखा अभियंता पद्माकर आढारी, अतिक्रमण निरीक्षक रामचंद्र कांबळे, बीट निरीक्षक विक्रम चव्हाण, शुभांगी चंदनकर, कोमल ठोंबरे, ड क्षेत्रिय कार्यालयाचे बीट निरीक्षक संदीप पाटील, शेषराव आटकोरे, कर्मचारी महेंद्र कांबळे, गफार शेख, रघुनाथ पुजारी आदी उपस्थित होते.
यावेळी सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक युवराज कलगुटगे, पोलिस उपनिरीक्षक भीमसेन शिखरे, १४ पोलिस अंमलदार, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे २५ जवान, २५ मजूर, अतिक्रमण विभागाची चार पिंजरा वाहने यांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली. परिसरातील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
















