न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२४) :- पिंपरी चिंचवड व भोसरी मतदारसंघातील सर्व इच्छुक उमेदवारांची पुणे काँग्रेस भवन येथे निरीक्षक आमदार यशोमती ठाकूर यांनी मुलाखती घेतल्या.
यावेळी शहराध्यक्ष कैलास कदम, पुणे अध्यक्ष अरविंद शिंदे, पुणे ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, पुणे लोकसभा निरीक्षक अजित दरेकर आदी उपस्थित होते.
चिंचवड मतदारसंघातून डॉ. कैलास कदम, संदेश नवले, तुकाराम भोंडवे, प्रियंका मलशेट्टी, कदम, सज्जी वर्की, सायली नढे, शशी नायर, राजन नायर, भरत वाल्हेकर यांनी तर, पिंपरी मतदारसंघातून विश्वनाथ जगताप, मनोज कांबळे, बाबासाहेब बनसोडे, गौतम आरकडे, शामला सोनवणे, ज्योती गायकवाड, डॉ. मनीषा गरुड, चंद्रकांत लोंढे, पंकज बगाडे, अर्चना राऊत आणि भोसरी मतदारसंघातून सोमनाथ शेळके, विठ्ठल शिंदे, स्मिता पवार या इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या.
















