- आयआयबीएम शैक्षणिक समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांच आवाहन..
- संस्थेच्या वर्धापनदिनी गुणवंत शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचा ‘लॉयल्टी अवॉर्ड’ पुरस्काराने सन्मान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ ऑक्टोबर २०२४) :- चिखलीतील आयआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट या संस्थेचा १७ वा वर्धापन दिन उत्साहात नुकताच संपन्न झाला. ज्यांची सेवा १०, ७ आणि ५ वर्ष झाली आहे आणि विद्यार्थी घडविण्यासाठी ते उत्तमरित्या कार्य करीत आहेत, असे संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक वर्ग आणि प्रशाकीय कर्मचारी यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर यांच्या हस्ते ‘लॉयल्टी अवॉर्ड’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

तब्बल दहा वर्ष सेवा बजावणारे आयआयबीएम कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे विभागप्रमुख अमोल भागवत, पांडुरंग मंचरे, राजेश पेंडणेकर यांचा तसेच ७ वर्ष सेवा बजावणाऱ्या संस्थेच्या प्रशासकीय प्रमुख कु. प्रतिक्षा डफळ, विभागप्रमुख अनिकेत वंजारी आणि ५ वर्ष सेवा बजावणाऱ्या एकता सिंग, प्रेरणा कणावजे, डॅनियल रंगरेझी, सहायक कर्मचारी अनिता जवंजाळ, शांता रणदिवे यांचा या पुरस्कारामध्ये समावेश आहे. दहा वर्ष लायल्टी अवॉर्ड मिळालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना संस्थेतर्फे मेडिकल सुविधा प्रदान करण्यात आली आहे.
यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. धनंजय वर्णेकर, शीतल वर्णेकर, संचालक राम रैना, प्राचार्य प्रदीप फुलकर, विभागप्रमुख अमोल भागवत तसेच आयआयबीएम कॉलेज, कॅम्ब्रीज ग्रुप ऑफ स्कूल पुणे, चॅम्प इंटरनॅशनल स्कूल, जेट इंडिया, वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशन व आयआयबीएम ग्रुपचा सर्व शिक्षकवर्ग, प्रशासकीय कर्मचारी, सपोर्टिंग स्टाफ आदींनी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.
डॉ. धनंजय वर्णेकर म्हणाले, आधुनिक जगातील आव्हानांचा सामना करण्यासाठी विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनवा. त्यासाठी नाविण्यापुर्वक अभ्यासक्रमावर भर द्या. नवीन उपक्रम राबवा. नवनवीन अभ्यासक्रमपर कौशल्य त्यांच्यात रुजुवा. विद्यार्थ्यांसोबत जबाबदारीने वागा. आगामी पाच वर्षांत राज्यातील विविध ठिकाणी संस्थेचा विस्तार होणार आहेत. सर्वांनी एकनिष्ठ राहत जबाबदारीने काम करावे. नजीकच्या काळात कदाचित वर्णेकर युनिव्हर्सल फाउंडेशन, आयआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या पदावर काम करण्याची सुवर्णसंधी तुम्हाला मिळू शकेल. त्यासाठी कठोर परिश्रम करण्याची आजच तयारी करा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
याप्रसंगी मनोरंजन, डान्स, भाषण आणि पुरस्कारप्राप्त पदाधिकारी आणि कर्मचारी यांच अभिनंदन करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
















