आकुर्डी (दि. १० मे २०१९) :- इंडियन मेडीकल असोशिएशनच्या (आय.एम.ए) पिंपरी – चिंचवड – भोसरी शाखा आणि पिंपरी – चिंचवड डॉक्टर्स असोशिएशन (पी.सी.डी.ए) यांच्या संयुक्त विद्यमाने “मेडीकोलिगल” या विषयावर आकुर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.
तसेच रुग्णाच्या नातेवाईकांकडून रुग्णालयाची होणारी तोडफोड रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड परिसरात पहिल्यांदाच तात्काळ प्रतिसाद सेवेचा (क्विक रिस्पॉन्स सर्व्हिस) या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
क्विक रिस्पॉन्स सर्व्हिस सुरू करण्यासाठी कोअर इंडिया इंस्टिट्यूट ऑफ़ लिगल मेडिसिन व निवृत्त पोलिस कल्याण संस्था यांनी पुढाकार घेतला. याबद्दलची माहिती डॉ. भाग्यश्री काकडे आणि सुरेश कमलाकर यांनी दिली.
या सेमिनारचे उद्घाटन प्रसंगी पुणे ग्राहक मंचाचे अध्यक्ष अनिल खडसे, ग्राहक मंचाचे सदस्य शुभांगी दुनाखे, संगीता देशमुख, क्षितिजा कुलकर्णी, अनिल जावळेकर या बरोबरच राज्य ग्राहक मंचाचे सदस्य डॉ. संतोष काकडे आदी उपस्थित होते.
यावेळी अनिल खडसे, डॉ.संतोष काकडे, डॉ. जयंत नवरंगे, डॉ. गिरीराज गांधी आणि डॉ. कासार यांनी डॉक्टरांना मेडीकोलिगल” या विषयावर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड डॉक्टरांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. कार्यक्रम आयोजनासाठी आय.एम.ए.पी.सी.बीचे विश्वस्त डॉ. दिलीप कामत, पी.सी.डी.ए चे अध्यक्ष डॉ. संजीव दात्ये, आय.एम.ए.पी.सी.बीचे अध्यक्ष डॉ.सुहास माटे, डॉ. संजय देवधर आणि डॉ.सुधीर भालेराव यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संतोष लाटकर यांनी केले व डॉ.सुधीर भालेराव यांनी आभार मानले.











