- महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ ऑक्टोबर २०२४) :- महिला अधिकारी आणि कर्मचा-यांच्या आकर्षक रांगोळीची स्पर्धा, फॅन्सी ड्रेस स्पर्धेत विविध वेषभूषेतील महिलांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा आणि कडधान्य व भाज्यांच्या नैसर्गिक रंगानी युक्त चौरंगी हलवा तसेच पराठा, थालपीठासह झणकेबाज तिखट पदार्थ यांनी सजलेल्या पाककला विविध स्पर्धा नुकत्याच पार पडल्या.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ४२ व्या वर्धापनदिनानिमित्त १० ऑक्टोबर रोजी पाककला, फॅन्सी ड्रेस आणि रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आलेले होते. तथापि त्या दिवशी थोर उद्योगपती पद्मविभूषण दिवंगत रतन टाटा यांचे निधनामुळे सदर स्पर्धांचे नियोजन १६ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये करण्यात आले होते. त्यानुसार माध्यमिक शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेल्या पाककला, फॅन्सी ड्रेस आणि रांगोळी स्पर्धेतील विजेत्या कर्मचा-यांची नावे पुढीलप्रमाणे..
नाष्ट्याचा गोड पदार्थ विथ स्मुदी – या पदार्थात कॉम्प्यूटर ऑपरेटर स्मिता जोशी यांनी प्रथम, लघुलेखक शिल्पा निफाडकर यांनी द्वितीय तर प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षिका जयश्री सालोटगी यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत उपलेखापाल गीता धंगेकर आणि पूजा भोसले यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.
नाष्ट्याचा तिखट पदार्थ विथ सॅलड – या पदार्थात उपलेखापाल दिपाली कर्णे यांनी प्रथम, प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षिका सारिका सूर्यवंशी यांनी द्वितीय तर गुणवत्ता आश्वासक सहाय्यक सरिता गायकवाड यांनी तृतीय क्रमांक मिळविला. या स्पर्धेत लिपिक रेश्मा जगताप आणि शिक्षिका सीमा बुरांडे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
फॅन्सी ड्रेस स्पर्धेत कॉम्प्यूटर ऑपरेटर माधुरी चव्हाण यांनी प्रथम, लिपीक मनिषा खेडकर यांनी द्वितीय तर क्रिडा पर्यवेक्षक जयश्री साळवे यांनी तृतीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत शिक्षिका जयश्री सालोटगी आणि सरिता गायकवाड यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
तर रांगोळी स्पर्धेत वर्षा शेलार यांनी प्रथम, सिमा बुरांडे यांनी द्वितीय आणि शितल फुले यांनी तृतीय क्रमांक मिळविला. तर, कुमार कटके आणि समीर पटेल यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले.
स्पर्धेतील विजेत्यांना महिला वैद्यकीय अधिकारी डाॅ. वर्षा डांगे, डाॅ. अंजली ढोणे, प्रशासन अधिकारी राजीव घुले, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक तसेच विविध विभागातील महिला कर्मचारी उपस्थित होत्या. स्पर्धेच्या परिक्षणाचे कामकाज माध्यमिक शिक्षिका शुभदा ताठे, चारूशीला फुले, कलाशिक्षक सागर बंडलकर यांनी पाहिले. स्पर्धेचे व बक्षिस वितरणाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले तर उपस्थितीतांचे आभार राजीव घुले यांनी मानले.











