न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुक ही भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता यावी यासाठी व्यापक प्रतिबंध कारवाईचा आराखडा तयार केला आहे. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गुन्हे करणारे व लोकांमध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांच्या हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवुन गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत पोलीस अधिकारी व अंमलदार यांना पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी निर्देश दिले आले आहेत.
आचारसंहिता लागु झाल्यापासुन अवैधरित्या वाहतुक करीत असलेली एकुण ७९,६६,७८० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आलेली असून ७७,७१,६०८ रु किमतीची १,६०,०२२ लीटर अवैध दारुसाठा जप्त करणेत आलेला आहे. मोठया प्रमाणात अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आला असून ज्यामध्ये १६,९०,०००/- रुपये किंमतीचा ३३ किलो ०८ ग्रॅम गांजा, १७,२०,०००/- रुपये किमतींची १७२ ग्रॅम एम.डी, ३ ग्रॅम वजनाची ५,४०० किमतीचे अफीम जप्त करण्यात आलेले आहे.
तसेच मोठया प्रमाणावर प्रतिबंधक कारवाई राबविणेत येत असून भारतीय नागरिक सुरक्षा संहिता मधील तसेच विविध कायद्याअंतर्गत आतापर्यंत एकुण १,४३८ व्यक्तींविरोधात प्रतिबंधक कारवाई करणेत आलेले आहे. ६ गुन्हेगारी टोळयातील २८ आरोपींच्या विरुध्द मोका कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली असुन ६ आरोपीना स्थानबध्द करणेत आलेले आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत निवडणुकींचे अनुषंगाने तपासणीकरीता १७ फलॉईग स्कॉड तयार करण्यात आलेले असुन त्याकरिता ३६ अधिकारी व १०२ अमंलदार नेमण्यात आलेले आहेत व स्टॅटिक सव्हिलन्सची १४ पथके तयार करण्यात आलेली असुन त्याकरीता ८४ अंमलदार यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. मोठया प्रमाणावर कोंबिंगदवारे गुन्हेगारांची व नाकाबंदीदवारे वाहनांची कसुन तपासणी करणेत येत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हददीत सार्वजिक विधानसभा निवडणुक २०२४ ही अतिशय शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडावी व कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होउ नये याकरिता पोलीस अधिकारी व अंमलदार अहोरात्र मेहनत घेत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्तालयाकडून देण्यात आली आहे.

















