न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ नोव्हेंबर २०२४) :- चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चे अनुषंगाने संवेदनशील भागात रूट मार्च घेण्यात आला.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आणि नागरिकांच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी सोमवारी सायंकाळी संवेदनशील भागात चिंचवड पोलिस स्टेशन च्या वतीने रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते.
हा रूट मार्च वेताळनगर झोपडपट्टी ईदगाह मैदान-चाफेकर चौक- गांधी पेठ- आलमगीर मस्जिद- काकडे पार्क- केशवनगर -मोरया क्रीडा संकुल तसेच शिवाजी चौक वाल्हेकर वाडी-मदर से जामिया ट्रस्ट -सायली कॉम्प्लेक्स- रजनीगंधा सोसायटी- वाल्हेकरवाडी चौकी या परिसरात घेण्यात आला.
चिंचवड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी तसेच पोलिस निरीक्षक दीपक गोसावी आणि अन्य वरिष्ठ पोलिस अधिकारी तसेच चिंचवड पोलिस स्टेशनकडील ०७ पोलीस अधिकारी व ३६ पोलीस अंमलदार यांच्यासह बी.एस.एफ व ०३/३० सी. आय. एस.एफ कंपनी कडील ०२/३० असे एकुण ०५ अधिकारी व ६० जवान हजर होते.
















