न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ नोव्हेंबर २०२४) :- चारही विधानसभा मतदारसंघातील विधानसभा निवडणुकीत २०१९ मध्ये १४ हजार २४६ मतदारांनी नोटाला मतदान केले. निवडणुकीतील उमेदवारांना मतदान न करता मतदारांनी ‘नोटा’ला मतदान केले. चिंचवड मतदारसंघात नोटाला सर्वाधिक ५ हजार ८५४ मतदान झाले. तर मावळात सर्वात कमी १ हजार ४९० मतदारांनी नोटाला मतदान केले आहे. चारही मतदारसंघात गेल्या चारही विधानसभा निवडणुकीत ०.५० ते दोन टक्केपर्यंत नोटाला मतदान झाले होते.
मतदानासाठी १९९० पासून ईव्हीएम मशीनचा वापर सुरू झाला. त्यापूर्वी बैलेट पेपरवर मतदान होत असे. ईव्हीएमवर २०११ मध्ये नोटाचा वापर सुरू झाला. त्यापूर्वी नोटा अस्तित्वात नव्हता, उमेदवारांची नावे आणि त्यांच्या चिन्हानंतर सर्वांत शेवटी यापैकी कुणीच नाही म्हणजे नोटा या पर्यायाचा वापर सुरू झाला सरासरी दरवर्षी प्रत्येक मतदारसंघात ०.५० ते दोन टक्के पर्यंत नोटाला मतदान होते. लोकसभा निवडणुकीत तीन ते पाच टक्क्यांपर्यंत नोटाला मतदान झालेले आहे. ईव्हीएम मशीनवर दर्शविलेल्या २०११ मध्ये उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर, वरीलपैकी कोणीही नाही म्हणजे नोटा हा पर्याय निवडणे मतदारांना शक्य झाले.
२०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात एकूण ११ हजार ११ मतदान नोटाला झाले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त पिंपरी मतदारसंघात ४.४३२ मतदान नोटाला झाले होते. त्याखालोखाल चिंचवड मतदारसंघात ३.२०३ मादांनी नोटाला मतदान केले होते. तर भोसरी मतदारसंघात २.४४७ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला होता.
२०११ ला विधानसभा निवडणुकीत चारही मतदारसंघात एकूण १४ हजार २४६ मतदान नोटाला झाले होते. त्यामध्ये सर्वांत जास्त चिंचवड मतदारसंघात ५ हजार ८७४ मतदान होते. त्याखालोखाल पिपरी मतदारसंघात ३ हजार २४६ मतदारांनी नोटाला मतदान केले होते. भौसरी मतदारसंघात ३ हजार ६३६ मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला, मावळ मतदारसंघात १ हजार ४९० मतदारांनी नोटाला पसंती दिली होती.
















