- असं म्हटल्याचा राग आल्याने धारदार शस्राने आई गार्डनजवळ तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०२४) :- ‘काय रे आई घाल्या तुला काय सांगीतले होते, दापोडीत यायचे नाही, तरी तु तुझी आई ईकडे का घातली? अशी शिवीगाळ आणि दम मित्रासह फिरायला गेलेल्या तरुणाला आरोपीने दिला. त्यावर तरुणाने ‘भाउ मी तर आई गार्डनला माझ्या मित्रांना भेटायला आलो होतो. आता माझ्या घरी जात आहे, दापोडी सर्वांची आहे’ अस उत्तर दिलं.
दरम्यान चिडून जाऊन आरोपीने तरुणावर लोखंडी धारदार हत्याराने वार केला. हत्यार मानेवर जोराने मारायला फिरवले असता तरुणाने मान मागे केली, त्यामुळे आरोपीचा वार हुकला. पुन्हा त्या हत्यारानेच वार केला असता तरुणाने डाव्या हाताने ते हत्यार अडविले. त्यामुळे डाव्या हाताच्या मनगटावर गंभीर दुखापत झाली.
तरुणाने मदतीसाठी लोकांना आवाज दिला असता “खबरदार जर कुणी याच्या मदतीला आला, एक-एकाला कापुन टाकेल, मला मोसीन भाई म्हणतात, मी जेल ची हवा खाउन आलो आहे.” अशी जमलेल्या लोकांना दमबाजी केली. त्यानंतर तेथे कोणीतरी पोलीस आले असे ओरडल्याने आरोपीने गवतात त्याच्या हातातले लोखंडी मोठ्या चाकुसारखे दिसणारे हत्यार फेकुन दिले व तेथुन पळुन गेला.
हा प्रकार (दि. १३) रोजी दुपारी ३.००ते ३.१५ वा चे दरम्यान आई गार्डन ते सांगवी कडे जाणारा सार्वजनिक रस्ता, गणेश हॅरीटेज या बिल्डींगजवळ घडला.
फिर्यादी आनंद वसंत कांबळे (वय ३१ वर्षे रा. जुनी सांगवी) याने आरोपी मोसीन बाबु सय्यद (वय ३० वर्षे रा. जयभीमनगर, दापोडी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. दापोडी पोलिसांनी ७४९/२०२४ भारतिय न्याय संहिता कलम १०९, ३५२, ३५१ (२), भारतीय हत्यार कायदा ४, २५ आणि फौजदारी सुधारणा कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहेत. पोउपनि कांबळे पुढील तपास करीत आहेत.
















