- पिंपरी चिंचवड पोलीसांची आचारसंहिते दरम्यान कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- विधानसभा निवडणुक ही भयमुक्त व पारदर्शक व निःपक्षपातीपणे पार पाडता यावी यासाठी आचारसंहिते दरम्यान पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड पोलीसांकडून व्यापक प्रतिबंध कारवाई करण्यात आली.
नाकाबंदी दरम्यान विविध ठिकाणी अवैधरित्या वाहतुक करीत असलेली एकुण १,७६,१७,५१०/- रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली. अवैध अग्निशस्त्रे ४९ व १०० काडतुसे व कोयता, तलवार अश्या प्रकारची ९३ घातक धारदार शस्त्रे जप्त करण्यात आलेली आहेत.
तसेच १,१४,३२,३८२ रु किंमतींचा २,४१,२५९ लिटर अवैध दारुसाठा मोठ्या प्रमाणात जप्त करन्यात आलेला आहे. ३७,९३,०००/- रुपये किंमतीचा ४१ किलो ४६२ ग्रॅम गांजा व इतर अंमली पदार्थाच साठा जप्त करण्यात आला आहे. विविध कायदयाअंतर्गत आतापर्यंत एकुण १,४३८ व्यक्तींविरोधात प्रतिबंधक कारवाई करणेत आलेले आहे. १० गुन्हेगारी टोळयातील ४१ आरोपींच्या विरुध्द मोका कायदयान्वये कारवाई करण्यात आलेली असुन ०७ आरोपींना स्थानबध्द करणेत आलेले आहे.
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत निवडणुकींचे अनुषंगाने तपासणीकरीता १७ फलॉईग स्कॉड तयार करण्यात आलेले असुन त्याकरिता ३६ अधिकारी व १०२ अमंलदार नेमण्यात आलेले आहेत व स्टॅटिक सर्व्हिलन्सची १४ पथके तयार करण्यात आलेली असुन त्याकरीता ८४ अंमलदार यांची नेमणुक करण्यात आलेली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील एकुण शस्त्रपरवाना धारकांपैकी ९९ % शस्त्रे जमा करणेत आली आहेत. मोठया प्रमाणावर कोंबिंगदवारे गुन्हेगारांची व नाकाबंदीद्वारे वाहनांची कसुन तपासणी करणेत येत आहे.
दरम्यान बालेवाडी स्टेडियम येथे होणाऱ्या पिंपरी व भोसरी या विधानसभा मतदारसंघाच्या मतदान मोजणी केंद्रास व स्ट्रॉंग रूमला पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी भेट देऊन सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहणी केली व आवश्यक त्या सुचना केल्या.

















