न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०२४) :- राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान होत आहे. पिंपरी चिंचवड शहर पोलीस हद्दीत ६ विधानसभा सदस्यांची निवडणूक हद्द असल्याने पार्किंग व वाहतूक व्यवस्थेकरिता मोठा पोलीस बंदोबस्त पिंपरी शहर पोलीस आयुक्तालयाने नियुक्त केला आहे. शहर वाहतूक पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सर्व विभागीय वाहतूक निरीक्षकांना त्याबाबत सूचना दिल्या असून स्वयंसेवक, एसपीओ ,पोलीस मित्र हे पार्किंग बंदोबस्ताकरिता प्रत्येक मतदान केंद्रावर कार्यरत असतील असे सूचित केले आहे.
निगडी वाहतूक विभागामध्ये ३१ मतदान केंद्र असून प्रत्येक मतदान केंद्रावर व्यवस्थित बॅरिगेट्स व्यवस्था राबविण्याकरिता एसपीओ हे वॉर्डन, अंमलदार पोलीस ह्यांना सहकार्य करणार आहेत. त्याचप्रमाणे पार्किंग संदर्भात मतदान करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मदत करणार आहेत.
या संदर्भात पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे म्हणाल्या,” आज निगडी हद्दीत प्रत्येक ३१ मतदान केंद्राच्या ठिकाणी एसपीओ ,पोलीस मित्रांनी दुपारी २ वा.पासून ते ५ वाजेपर्यंत आपआपल्या नियुक्ती केलेल्या ठिकाणांची जागेवर पोहचून पाहणी केली असून.उद्या सकाळी ५.३० वाजेपासून सर्व जण आपआपले पार्किंग व्यवस्थेकरिता कर्तव्य बजावतील.प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे एसपीओ, स्वयंसेवक हे नेहमीच पोलीस प्रशासनांला मदत देत असतात.”
प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार पाटील म्हणाले,” पिंपरी विधानसभा हद्दीतील निगडी वाहतूक विभागात ३१ मतदान केंद्र असलेल्या शाळा परिसरात वाहतुकीमुळे व पार्किंग मुळे मतदान प्रक्रियेमध्ये कोणतीही अडचण निर्माण होऊ नये म्हणून नियुक्त केलेले एसपीओ हे नागरिकांना सौजन्याने सूचित करणार असून.मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करणार आहेत.”

















