न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२४) :- ‘चिंचवड येथील प्लॉटची बोलणी करायची आहे’ अशी खोटी बतावणी केली. सन २०१३ मधील व्यवहारामध्ये ५ लाख रुपये गुंतवणुकीच्या बदल्यात फिर्यादी यांनी आरोपीला १२,५०,००० रु. देवुन सध्दा अधिकच्या ५० लाख रुपयांची आरोपीने मागणी केली. त्यास फिर्यादी यांनी नकार दिला. त्यांना हाताने मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली.
फिर्यादी यांच्या गळयातील सोन्याच्या दोन लहान व दोन मोठ्या चैन जबरदस्ती खेचल्या. त्यामध्ये फिर्यादी यांच्या चैनमधील काही भाग तेथे पडुन गहाळ झाला. तसेच फिर्यादीच्या ताब्यातील आयफोन कंपनीचा ५५,००० रु. किंमतीचा टॅब जबदरस्ती काढुन घेतला, असे फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि.०६) रोजी स.०९.३० वा. चे सुमा के ९ हॉटेल, रहाटणी येथे घडला. बिपीनकुमार जयप्रकाश उपाध्याय (वय ३६ वर्षे रा. कुंजीर कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी प्रमोद सुभाष कुंजीर (वय ४१ वर्षे रा. गणेश मंदिरा शेजारी, रहाटणी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
सांगवी पोलिसांनी ४८५/२०२४ भा. न्या. सं २०२३ चे कलम ३०९ (६), ३५२,३५१(२) अन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपी अटकेत आहे. पोउपनि कणसे पुढील तपास करीत आहेत.
















