न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०२४) :- बहिणीच्या प्रेम संबंधाबाबत माहिती मिळाल्याने फिर्यादीच्या २४ वर्षीय मुलाला फोन करुन घरातून बाहेर बोलावले. त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या डोक्यात धोंडा (दगड) मारुन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर आरोपी त्याच्या मित्रासह पळून गेला आहे.
हा प्रकार (दि.२३) रोजी रात्री १२:०० वा.चे सुमा. यमुना कॉलनी, लांडगेवस्ती, भोसरी येथे घडली. याप्रकरणी महिला फिर्यादीने आरोपी शुभम संभाजी पांचाळ (वय २० वर्षे रा. भोसरी) याच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
भोसरी पोलिसांनी ७६९ /२०२४ भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३ (५) नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे. पोउपनि गुरव पुढील तपास करीत आहेत.
















