- योगा टीचरसह मयत तरुणाची प्रेयसी अडचणीत; चाकणमधील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ नोव्हेंबर २०२४) :- प्रेयसीने योगा टिचरच्या मदतीने प्रियकराला रेपच्या खोटया केसमध्ये अडकविण्याची धमकी दिली. टेलीग्राम आणि व्हाटसअॅपवर घाणेरड्या भाषेत शिवीगाळ केली. तरुणाचा अपमान केला. त्याला कंटाळुन फिर्यादीचा भाऊ सूर्यकांत रामदयाल प्रजापती (वय २७ वर्षे) याने आत्महत्या केली आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
हि घटना १ ऑगस्ट २०२४ पासून ते दिनांक दि.१८/१०/२०२४ पर्यंत श्रीरामनगर, घाटकर हॉस्पीटल मागे शिक्रापूर रोड चाकण येथे घडली. फिर्यादी श्रीकांत रामदयाल प्रजापती (वय २५ वर्षे) यांनी आरोपी १) महिला आरोपी, २) बापू सोनवणे (पत्ता माहित नाही) यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे.
चाकण पोलिसांनी ८६७/२०२४ भारतीय न्याय संहिता क १०८ (३) (५) प्रमाणे दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि मोरे पुढील तपास करीत आहेत.












