न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ नोव्हेंबर २०२४):- लिव्ह अॅन्ड रिलेशनमध्ये राहणा-या महिलेची हत्या करुन पुरावा नष्ट करण्याकरीता प्रेत खंबाटकी घाट, सातारा येथे फेकुन दिले. दरम्यान वाकड पोलीस ठाणे येथे मिसींग तक्रार देणाऱ्या प्रियकरानेच तिची हत्या केल्याचा गुन्हा १२ तासाच्या आत उलगडण्याची कामगिरी वाकड पोलीसांनी केली आहे.
वाकड पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, वाकड पोलीस ठाणे येथे दिनेश पोपट ठोंबरे, (वय ३२ वर्षे, रा. मु बहुर पो करूंज, ता मावळ) याने त्याची प्रेयसी जयश्री विनय मोरे (वय २७ वर्षे, रा, मारूंजी, हिंजवडी) ही (दि. २७) रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास जिंजर हॉटेल, भुमकर चौक, वाकड येथून काही न सांगता निघून गेली. ती परत आली नाही, अशा तक्रारीवरुन मनुष्य मिसिंग नोंद क्रं ३३४/२०२४ दि.२६/११/२०२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या मिसिंगच्या तपासादरम्यान मिसिंग महिलेच्या वर्णनाचे एक प्रेत खंबाटकी घाट (खंडाळा) जि सातारा येथे मिळून आले. तिच्या डोक्यावर गंभीर जखमा आहेत, अशी माहिती खंडाळा पोलीस ठाण्याकडुन प्राप्त झाली. प्रेताच्या फोटोवरुन जयश्री या मिसींग महिलेची डेडबॉडी असल्याची खात्री झाली. मयत महिलेच्या अंगावरील जखमांवरुन तिची हत्या झाली असल्याने, तक्रारदार दिनेश ठोंबरे यानेच तिची हत्या केल्याचा संशय आल्याने त्याला विजय नगर, काळेवाडी येथून ताब्यात घेतले. त्याचेकडे कौशल्यपूर्ण चौकशीमध्ये त्याने नमुद महिलेचे दुसरे पुरुषा बरोबर सबंध असल्याचा संशय व त्यास पैशाची मागणी या कारणामुळे जिंजर हॉटेल सर्व्हिस रोड, भुमकर चौक परिसरात त्यांची भांडणे झाली. त्यावेळी त्याने त्याच्या कारमधील हातोडी जयश्री मोरे हिच्या डोक्यात मारुन गंभीर जखमी करून तिचे प्रेत सातारा हायवेने कारमधन नेऊन खंबाटकी घाट (खंडाळा) जि सातारा परिसरात पुरावा नष्ट करण्यासाठी फेकून दिल्याची कबुली दिली. मयत महिलेच्या ३ वर्षाच्या मुलास आळंदी येथे सोडुन दिले. वाकड पोलीस ठाणे पुढील तपास करीत आहे.












