कंपनीतील कामगारांमध्ये दहशतवादीचे वातावरण..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२४):- चाकण एमआयडीसी येथील वेरॅक कंपनीमध्ये लाईनवर काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्याला मारहाण आणि शिवीगाळ करण्याची गंभीर घटना घडली आहे. चक्क कंपनीतच ही घटना घडल्यामुळे कामगारांमध्ये दहशतवादीचे वातावरण पसरले आहे.
सविस्तर हकीकत अशी की, तक्रारदार हे कंपनीत लाईन वर काम करत होते. त्याचवेळी तेथील कामगार त्यांच्यापाशी आला. “कंपणीत तुम्ही सर्वजण माझ्या विषयी रोज बोलत असता, माझ्याकडे बघुन हसता. माझी सतत चर्चा करत असता. तुला बघुन घेईन” असे म्हणत त्यांचेशी भांडण उकरून काढले. त्यावर ‘माझे काम करु दे, मी किंवा माझे मित्र तुझे नाव घेत नाही. तुझी चर्चा सुध्दा करत नाही, तुझा गैरसमज झाला आहे, असे तक्रारदार त्याला म्हणाले.
त्याचा राग आल्याने आरोपीने त्याच्या जवळ असलेला कटर तक्रारदार याच्या खांदयाजवळ मारला. स्वतःचा बचाव करीत पळून जात असताना मागुन खाली पडलेला ट्रे आरोपीने फेकुन मारला. त्यामुळे तक्रारदार यांना गंभीर दुखापत झाली आहे.
ही घटना (दि. २८) रोजी सायं सहा वाजण्याच्या सुमारास वॅरॉक कंपणी महाळुंगे ता. खेड जि.पुणे येथे घडली.
सचिन कमलेश राजपूत (वय २१ वर्ष राहणार महाळुंगे तालुका खेड जिल्हा पुणे) यांनी आरोपी किरण दशरथ आडे (वय २४ वर्ष आंबेठाण चौक चाकण ता खेड जि पुणे) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांकडून ८११/२०२४ बी.एन.एस.२०२३ चे कलम ११८ (२), ११५,३५२, ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी अटकेत आहे. पुढील तपास पोउपनि मुल्ला हे करीत आहेत.












