- पिं. चिं. अॅड. असोसिएशनच्या नवनिर्वाचित कार्यकारणीकडून पदभार स्वीकृत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० नोव्हेंबर २०२४) :- पिंपरी चिंचवड अॅडव्होकेट असोसिएशन सन २०२४ व २०२५ च्या नवनिर्वाचित कार्यकारिणीला मागील वर्षातील सन २०२३-२०२४ च्या प्रथम महिला अध्यक्ष प्रमिला गाडे व कार्यकारणीने नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. पांडुरंग शिनगारे आणि नवनियुक्त कार्यकारिणीला पदभार सुपूर्द केला.
महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुण्यतिथी दिनानिमित महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. निवडणूक अधिकारी म्हणून माजी अध्यक्ष नारायण (नाना) रसाळ यांनी काम पाहिले. त्यांनी निवड झालेल्या अधिकृत उमेदवाराची यादी जाहीर केली. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणी यांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रमुख उपस्थिती माजी उपाध्यक्ष प्रतीक जगताप यांनी मागील सन २०२३-२०२४ च्या कार्यकारणीने केलेल्या कामकाजाचा उल्लेखनीय आढावा घेतला व नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारणी यांनी वकील हिताच्या बाजूने वर्षभरात काम करावे, अशा शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष अॅड. अरुण मामा खरात तर प्रमुख उपस्थिती माजी उपाध्यक्ष अॅड. प्रतीक जगताप यांची होते.
नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणी यांनी मागील वर्षाचे अध्यक्ष व कार्यकारणी यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. तसेच नवनिर्वाचित अध्यक्ष व कार्यकारिणी यांचा निवडणूक अधिकारी यांनी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. पांडुरंग शिनगारे यांनी आपण यापुढेही वकील हिताच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेऊन मागील वर्षीच्या कार्यकारणीच्या साथीने यावर्षीही कामकाज करू अशी ग्वाही दिली.
यावेळी माजी अध्यक्ष अॅड. सुनील कडुसकर, अॅड. किरण पवार,अॅड. सुदाम साने, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड..बी, के. कांबळे, अॅड. शशिकांत गावडे, अॅड. प्रताप कडुस, माजी उपाध्यक्ष अॅड. योगेश थांबा, अॅड. योगेश मळेवाडी, अॅड.. तेजस चवरे, अॅड. पल्लवी कुर्हाडे, अॅड. सागर आडागळे, अॅड. सूर्या महेंद्र दांडगे, अॅड. अतुल कांबळे, अॅड. अधिक चरेगावकर, अॅड. तुषार खरात घोलप, अॅड. नारायण थोरात, अॅड. विजय भगत, अॅड. शांताराम दामगुडे, अॅड. अनिल शेजवानी, अॅड. विनोद आढाव, अॅड. डांगे, अॅड. धीरज कुचेरिया, अॅड. भवले, अॅड. प्रिया रसाळ, अॅड. ओमकार नानेकर, अॅड. नाझिया, अॅड. पुनम शर्मा, अॅड. पूनम राऊत, अॅड. साक्षी झिरवनकर सोनवणे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन अॅड. विशाल पोळ व अॅड. सुनील कडूसकर यांनी केले व आभार प्रदर्शन अॅड. संदीप तापकीर यांनी केले.
अशी आहे नवीन कार्यकारिणी…
नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. पांडुरंग विठ्ठल शिनगारे, उपाध्यक्ष अॅड. अजय रामसुमेर यादव, सचिव अॅड. संदीप भाऊसाहेब तापकीर, महिला सचिव अॅड. संगीता रमेश कुशलकर, सहसचिव अॅड. पदमावती लक्ष्मण पाटील, खजिनदार अॅड. विशाल आसाराम पोळ, हिशोब तपासनीसपदी अॅड. प्रेरणा हरेश चंदानी, तसेच सदस्यपदी अॅड. विजय धोंडिराम भोंडे, अॅड. अक्षय कमलाकर चौधरी, अॅड. आरती दत्तात्रय कुलकर्णी, अॅड. पौर्णिमा भगवान मोहिते, अॅड. रूपाली रामचंद्र पवार, अॅड. सुषमा सुदर्शन पाटील.












