- अॅड. राजेश पुणेकर यांच्याकडे वकील संघटनेची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ डिसेंबर २०२४) :- नेहरूनगर न्यायालयात सोसायटीच्या शाखेसाठी ज्यादा सेवकांची नेमणूक करावी, अशी मागणी वकील संघटनेकडून पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे माजी अध्यक्ष तथा दि पुणे लॉयर्स कन्झ्यु. को. ऑप सो.चे तज्ञ संचालक अॅड. राजेश पुणेकर यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पिंपरी चिंचवड वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. किरण पवार, अॅड. योगेश थांबा, अॅड. अजित जाधव, सोसायटीचे कर्मचारी नाणेकर व अन्य वकील बांधव यावेळी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, नेहरूनगर पिंपरी न्यायालयामध्ये १७०० ते १८०० वकील काम करतात. हे वकील हे दि पुणे लॉयर्स कन्झ्यु.को. ऑप सो. सभासद आहेत. त्यांना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करवा लागत आहे. नेहरूनगर पिंपरी न्यायालयामधे सोसायटीची शाखा आहे. या शाखेमध्ये पुरेसे कर्मचारी नाहीत. सोसायटीची शाखा वकील बांधवांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आली आहे. या शाखेमधून वकील बांधव रोजच्या कामासाठी आवश्यक असणा-या वस्तू, कागद, तिकीट, स्टेशनरी, स्टॅम्प खरेदी करतात. परंतु, अन्य नागरिक देखील स्टॅम्प खरेदी करीता गर्दी करत असल्याने व एकच कर्मचारी असल्याने वकील व अन्य नागरिक यांचेमध्ये रोज वाद होत आहेत. सोसायटीची शाखा वकिलांच्या सेवेसाठी असुन वकील व अन्य नागरिक यांच्यातील वादावादीमुळे वकिलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे सोसायटीच्या कामकाजावर मोठा ताण निर्माण झाला आहे.
वकिलांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर आहे. सोसायटीच्या शाखेकरीता ज्यादा सेवकांच्या नेमणुकीची वकिलांची मागणी आहे. वकिलांची ही अडचण लवकरात लवकर सोडवून त्यांना दिलासा देणार आहे. – मा. राजेश पुणेकर, मा. अध्यक्ष पिंपरी चिंचवड वकील संघटना तथा तज्ञ संचालक दि पुणे लॉयर्स कन्झ्यु. को. ऑप सो.
















